आपण आणि आपली रोगप्रतिकारशक्ती

Covid 19 Immunity Marathi

२०२० च्या मार्च पासून  देशभरात करोना व्हायरसने थैमान घातले आहे. आणि तेव्हापासूनच एक शब्द सतत आपल्या कानावर पडतो आहे, तो म्हणजे इम्युनिटी किंवा रोगप्रतिबंधक शक्ती! काय असते ही रोगप्रतिबंधक शक्ती? रोगांवर नियंत्रण मिळवण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असायला हवी. आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम स्थितीत ठेवणे हा कुठच्याही आजारांपासून दूर राहण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. सर्दी, पडसे, खोकला, ताप अशा किरकोळ आजारांपासून ते अगदी कॅन्सर, मधुमेह आदि सारख्या व्याधींशी लढा देण्यात आपण यशस्वी किंवा अपयशी ठरतो ते आपल्या  रोगप्रतिकारक शक्ती मजबूत किंवा कमजोर असल्यामुळेच. याचा अर्थ असा होतो का की इम्युनिटी चांगली असलेली व्यक्ती आजारीच पडणार नाही? नाही, अशी व्यक्तीलाही कोणत्या न कोणत्या रोगाचा संसर्ग  होणारच, पण त्या रोगामुळे ती व्यक्ती गंभीर आजारी होणार नाही, आणि रोगाशी यशस्वी लढा देऊन ती पुन्हा एकदा निरोगी जीवन जगू शकेल!

रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे काय?

आपल्या शरीराची रोग निर्माण करू शकणाऱ्या जीवाणू , विषाणू  किंवा इतर अपायकारक घटकांपासून संरक्षण करण्याची क्षमता म्हणजेच प्रतिकार शक्ती, रोगप्रतिबंधक शक्ती किंवा इंग्रजीत “immunity”. इम्युनिटी ही दोन प्रकारची असते
१) उपजत किंवा जन्मजात प्रतिकार शक्ती (innate immunity) आणि
२) कमावलेली किंवा adaptive प्रतिकार शक्ती

शरीरात बरेच विषाणू व जीवाणू असतात. यातील काही शरीरासाठी गरजेचे असतात, तर काही घातक असतात. त्यामुळे या घातक विषाणूंसोबत लढा देण्याचं काम इम्युनिटी पॉवर करत असते. यामुळे शरीरात विषाणूंविरोधात लढण्याची ताकद या रोगप्रतिकारक शक्तीमधून मिळत असते.

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय करावे?

विशेष काही नाही, तुमची जीवनशैली जर निरोगी असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती ही आपोआपच चांगली राहते, फक्त तुमची जीवनशैली निरोगी आहे का ते पहा म्हणजे झालं!

  • समतोलआहार,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *