
गोड गैरसमज!
अनेकांचा असा गैरसमज असतो शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावरची चरबी कमी करता येते. फक्त त्या त्या भागाचा व्यायाम केला की झाले! उदा. पोटावरची चरबी (जिला आपण ढेरी असेही म्हणतो) कमी कयची असेल (belly fat-loss) तर अॅब-क्रंचेस (ab-crunches) नावाचा व्यायाम करावा, किंवा हाताच्या दंडावरील चरबी घालवायची असेल तर बायसेप्स कर्ल्स नावाचा व्यायाम करायचा वगैरे! पण हा अतिशय व्यापक आणि चुकीचा समज आहे! पोटाचा व्यायाम अॅब-क्रंचेस (ab-crunches) केल्याने तिथले स्नायू मजबूत होऊ शकतात, त्यांचा आकार मोठा होतो, पण चरबी जात नाही. तिथली चरबी कमी करण्याचे उपाय वेगळे आहेत, त्यांची आपण पुढे चर्चा करूया. अनेक जण सलमान खान किंवा शाहरूख खानसारखे सिक्स पॅक अॅब्ज मिळवण्यासाठी दिवसातले कित्येक तास अॅब-क्रंचेस (ab-crunches) करून दमून जातात पण ते त्यांना सध्या होत नाही अशी त्यांची तक्रार असते. याचे कारण काय, तर भरपूर अॅब-क्रंचेस केल्याने सिक्स पॅक अॅब्ज तयार होतात पण ते दिसत मात्र नाहीत! कारण, पोटावरच्या जाडजूड चरबीमुळे ते झाकले जातात! आहे की नाही मज्जा!
पोट, नितंब आणि कंबर या भागांवरची चरबी घालवण्यासाठी उपाययोजना
शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागावरची चरबी कमी करण्यासाठी दोन महत्वाचे उपाय आहेत:
- कमी कॅलरीयुक्त समतोल आणि पोषक आहार घेणे. (समतोल आहाराबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा)
- कार्डिओ प्रकारातला व्यायाम करणे (योगासने हा कार्डिओ व्यायाम नव्हे!) कार्डिओ प्रकारच्या व्यायामाबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
खूप छान