गरोदरपणातला मधुमेह

गरोदरपणातला मधुमेह किंवा जेस्टेशनल डायबिटीस म्हणजे काय?
What is gestetional diabetes?  (Marathi Info)

गरोदरपणातला मधुमेह

गरोदरपणातला मधुमेह gestational diabetes marathi info

गरोदरपणातला मधुमेह

ज्या गरोदर स्त्रियांना मधुमेह नसतो परंतु गरोदरपणात त्यांच्या रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण वाढते अशा स्त्रियांना गरोदरपणातल्या मधुमेहाची (जेस्टेशनल डायबेटिसची) लागण झाली आहे असे म्हणतात

गर्भावस्थेतील मधुमेह नक्की कशामुळे होतो हे जरी अजून कळले नसले तरी त्यामागचे काही आडाखे शास्त्रज्ञांनी बांधले आहेत. गर्भाच्या नाळेवाटे गर्भाला मातेकडून योग्य वाढीसाठी पोषक द्रव्ये मिळतात. यासाठी नाळेतून काही संप्रेरके स्त्रवतात. पण यांपैकी काही संप्रेरके मातेच्या इन्सुलिनच्या कार्यात बाधा आणतात. यालाच इन्सुलिन प्रतिरोध म्हणतात. याच इन्सुलिन प्रतिरोधाची पुढची पायरी म्हणजे मधुमेह!
सर्वसाधारणपणे हा मधुमेह गर्भावस्थेच्या २४ व्या आठवड्याच्या सुमारास होतो. अशा स्त्रियांना क्वचित प्रसंगी सतत तहान लागते किंवा वारंवार लघवीस जावे लागते.

गरोदरपणातला मधुमेह किंवा गर्भारपणातला मधुमेह कुणाला होऊ शकतो?

गरोदरपणातला मधुमेह दोन कारणांनी होऊ शकतो.

  1. ज्या स्त्रियांना वंध्यत्व किंवा मधुमेहाची कौटुंबिक पार्श्वभूमी आहे
  2. गरीब सामाजिक आर्थिक स्तरातील स्त्रिया
  3. अनियमित मासिक पाळी
  4. लठ्ठपणा किंवा वाढलेले वजन
  5. योनीमार्गाचा संसर्ग किंवा

गरोदरपणातला मधुमेह झाल्यामुळे कोणते आरोग्यविषयक धोके उद्भवतात ?

गरोदरपणातला मधुमेह झालेल्या स्त्रियांच्या रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण वाढल्याने ती साखर वारेमधून बाळाच्याही रक्तात जाते (पण त्यासोबत इन्सुलिन मात्र जाऊ शकत नाही ). त्यामुळे
बाळाच्या शरीरातील स्वादुपिंड ( pancreas ) अतिरिक्त ग्लुकोज कमी करण्यासाठी अधिकाधिक इन्सुलिन निर्माण करू लागते. अशा रीतीने बाळाच्या पेशींमध्ये
वाढीसाठी आवश्यक असलेल्या ऊर्जेपेक्षा अधिक ऊर्जा साखरेच्या रूपाने मिळाल्यामुळे ते लठ्ठ होण्याचा धोका संभवतो. परिणामी अनेक आरोग्य विषयक समस्या निर्माण होऊ शकतात ज्या पुढीलप्रमाणे आहेत:

  1. बाळाचे स्वादुपिंड ( pancreas ) अतिरिक्त इन्सुलिन तयार करीत असल्यामुळे जन्माच्या वेळी रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण कमी होऊ शकते
  2. जन्माच्या वेळी खांद्यांना दुखापत होण्याची शक्यता आणि श्वासोच्छवास करण्यास त्रास
  3. जन्मानंतर बाळ लठ्ठ असू शकते आणि त्याला प्रौढपणी प्रकार २चा मधुमेह (type-2 diabetes) होण्याची शक्यता वाढते .
Gestetional Diabetes  Marathi Info

गरोदरपणातला मधुमेह

गरोदरपणातला मधुमेह झाल्यावर उपचार काय करावेत?

भारतामध्ये गर्भावस्थेतील डायबेटिसचे प्रमाण वाढत चालल्यामुळे गरोदर स्त्रियांची नियमित तपासणी आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित ठेवणे गरजेचे आहे. यासाठी पुढीलप्रमाणे उपचार करता येतात.

  1. वेळोवेळी (आणि शक्य असल्यास स्वतःच ग्लुकोमीटरने) रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण तपासावे.
  2. ताण-तणावविरहित जीवनशैलीचा अंगीकार करावा.
  3. संतुलित आणि पोषक आहार घ्यावा, त्यासाठी आहारतज्ञाचा (dietitian) सल्ला घ्यावा. एकाचवेळी पोटभर जेवण्यापेक्षा दर २ ते ३ तासांनी थोड्या थोड्या प्रमाणत आहार घ्यावा.
  4. संतुलित आहार घेऊनही जर नंतरही रक्तातील ग्लुकोज साखरेचे प्रमाण नियंत्रित झाले नाही तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार जरूर सुरू करावा.
  5. गरोदरपणात अतिरिक्त वजन वाढ होऊ देऊ नये.

टाईप-२ प्रकारच्या मधुमेहात स्वादुपिंडात इन्सुलिनचं उत्पादन सुरू असतं, पण ते पुरेसं नसतं. जेवढं इन्सुलिन तयार होतं तेही प्रभावी ठरत नाही, कारण शरीराची
बोथट इन्सुलिन संवेदनशीलता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *