ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index Marathi Info)

ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index Marathi Info)

ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय? (What is glycemic index in Marathi?)

खाल्लेल्या अन्नातून ग्लुकोज साखर सुट्टी होऊन रक्तप्रवाहात किती वेगाने येते (हळूहळू येते की पटकन येते) यावर त्या अन्नपदार्थचा ग्लायसेमिक इंडेक्स ठरवला जातो ५५ पेक्षा कमी ग्लायसेमिक इंडेक्स असेल तर तो मधुमेही व्यक्तींसाठी योग्य समजला जातो. ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असलेले पदार्थ म्हणजे, साखर, गूळ, मध, पांढरा ब्रेड, बिस्किटे, उसाचा रस, पांढरा भात, उकडलेले बटाटे, रताळे, पिकलेले आंबे, केळी यांसारखी फळे, मैद्यापासून बनवलेले पदार्थ, साबुदाणा, रवा वगैरे. ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले पदार्थ म्हणजे सर्व धान्ये, कडधान्ये, मोड आलेली कडधान्ये, गव्हाच्या चपात्या, ज्वारी, बाजरी व मक्याच्या भाकऱ्या, हिरवे वाटाणे (मटार), इडली, डोसा वगैरे.

रोजच्या जीवनातील काही पदार्थांच्या ग्लायसेमिक इंडेक्सेस

दूध व दुधाचे पदार्थ

ग्लायसेमिक इंडेक्स

बिनसायीचे दूध 32
कमी सायीचे दूध 30
होल दूध 27
होल दुधाचे दही 45

फळे

ग्लायसेमिक इंडेक्स

सफरचंद (Apple) 38
जर्दाळू (Apricot) 57
केळी 55
खरबूज (Cantaloupe) 46
चेरी 22
पपनस (Grapefruit) 25
द्राक्षे (Grapes) 46
किवी (Kiwifruit) 53
आंबा (Mango) 56
संत्री (Orange) 44
पपई (Papaya) 58
पीच (Peach) 42
नाशपाती (Pear) 38
अननस (Pineapple) 66
प्लम (Plum) किंवा आलुबुखारा 39
कलिंगड (Watermelon) 72

सुका मेवा (Dried Fruits)

ग्लायसेमिक इंडेक्स

जर्दाळू (Apricots) 31
मनुका (Raisins) 64
खजूर (Dates) 103

फळांचे रस

ग्लायसेमिक इंडेक्स

सफरचंदाचा रस
(Apple Juice)
40
पपनसाचा रस
(Grapefruit juice)
48
संत्र्याचा रस
(Orange Juice)
52
अननसाचा रस
(Pineapple Juice)
46

धान्ये आणि कडधान्ये/डाळी

ग्लायसेमिक इंडेक्स

चणा डाळ 11
उडीद 43
चवळी (Black eyed beans) 41
उकडलेले चणे (Garbanzo Beans Boiled) 33
मूग (Green gram) 38
कुळीथ (Horse gram) 51
उकडलेला राजमा (Kidney beans boiled) 30
राजमा (Rajma) 19
उकडलेला सोयाबीन (Soyabean Boiled) 18
बाजरी (Bajra) 58
जवा (Barley) 25
ज्वारी (Jowar) 77 (शंकास्पद!)
नाचणी (Ragi) 86 (शंकास्पद!)
सातू (Rye) 34
ब्राउन राईस (Brown Rice) 55
सफेद तांदूळ (White Rice) 64
बासमती तांदूळ (Basmati Rice) 58
शेंगदाणे (Peanuts) 14

भाज्या

ग्लायसेमिक इंडेक्स

बीट (Beets) 64
गाजर (Carrots) 71
उकडलेले वाटाणे (Peas boiled) 48
उकडलेले गाजर (Boiled Carrots) 49
भाजलेले सफेद बटाटे (White Baked Potato) 85
उकडलेले बटाटे (Boiled Potatoes) 63
रताळे (Sweet Potato) 54
लाल भोपळा (Pumpkin) 75

रोजचे काही पदार्थ

ग्लायसेमिक इंडेक्स

ग्लुकोज (Glucose) 100
मध (Honey) 58
साखर (Table sugar) 65
फ्रुक्टोज (Fructose) 23
कोका कोला (Coca-Cola) 63
सोयाबीन दूध (Soya milk) 31

2 thoughts on “ग्लायसेमिक इंडेक्स (Glycemic Index Marathi Info)

  1. Nayan pagrut says:

    Chhan mahiti aahe

  2. pratik dabholkar says:

    कॅर्रोट्स boiled केल्यावर त्याचा ग्लयसिमीक इंडेक्स मध्ये वाढ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *