प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन मधुमेह (Pre-Diabetes Information in Marathi)

प्रि-डायबिटीस किंवा (बॉर्डरलाईन मधुमेह किंवा सौम्य मधुमेह) Pre-Diabetes OR Borderline Diabetes

प्रि-डायबिटीस किंवा (बॉर्डरलाईन मधुमेह किंवा सौम्य मधुमेह) Pre-Diabetes OR Borderline Diabetes

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस म्हणजे काय?

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस असणे ही तुमच्या आरोग्याशी निगडीत धोक्याची घंटा आहे. तुम्हाला प्रि-डायबिटीसचे निदान झाले असेल तर तुम्ही उंबरठा ओलांडलेला आहे पण फार उशीर झालेला नाही, कारण पुढे होऊ शकणारी डायबिटीस ही व्याधी टाळता येण्याची किंवा लांबणीवर टाकण्याची वेळ अजूनही गेलेली नाही. तातडीनं उपाययोजना केलीत तर होणारा मधुमेह अनेक वर्षे लांबणीवर टाकता येईल.

आपल्यापैकी अनेकांची जीवनशैली बैठी असते, ऑफिसात, दुकानात, गाडीत कुठेही आपण ‘काम’ करत असलो तरी ते बैठंच काम असतं. मेहनत, कष्ट यांचा अभाव असतो. उठता बसता फरसाण, चकल्या, बिस्कीटं यांचं गुऱ्हाळ चालूच असतं! सगळं लक्ष पैसे कमावण्यावर असतं, पण ज्या शरीरामुळे आपलं अस्तित्व असतं, त्याच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला अनेकांना वेळ नसतो. आणि आपल्या ह्या अशा वागण्यानेच भारताला हल्ली “डायबेटीसची जागतिक राजधानी” असं नको असलेलं विशेषण मिळतंय. बॉर्डरलाईन डायबेटीस या गोंडस नावाला भुलून अनेक जण दुर्लक्ष करून जंक फूड खात असतात आणि व्यायाम टाळतात. या चुकीच्या जीवनशैलीची कठोर शिक्षा नंतर काही वर्षांच्या आतच भोगावी लागते.

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस आहे हे कसे तपासावे : उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची तपासणी
How to diagnose Pre-diabetes: Fasting blood glucose test

ही तपासणी करण्यासाठी रुग्णाला कमीतकमी ८ तास उपाशीपोटी राहणे आवश्यक असते. त्यामुळेच सकाळी उठल्यावर काहीही न खाता रक्ताचा नमुना घेतला जातो. उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 100 mg/dL पेक्षा कमी असेल तर साधारणतः मधुमेह नाही असे समजले जाते. उपाशीपोटी रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 100 mg/dL पेक्षा जास्त पण 126 mg/dL पेक्षा कमी असेल तर प्रि-डायबिटीस आहे (किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस किंवा सौम्य प्रमाणात मधुमेह आहे) किंवा मधुमेहाची सुरुवात आहे असे मानले जाते.

जेवणानंतर २ तासांनी रक्तातील ग्लुकोज साखरेची तपासणी
Postprandial blood glucose test

ही तपासणी जेवणानंतर २ तासांनी केली जाते. रक्तातील ग्लुकोज साखरेची पातळी 140 mg/dL पेक्षा कमी असेल तर साधारणतः मधुमेह नाही असे समजले जाते. 140 mg/dL पेक्षा जास्त पण 199 mg/dL पेक्षा कमी असेल तर प्रि-डायबिटीस आहे (किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस किंवा सौम्य प्रमाणात मधुमेह आहे) किंवा मधुमेहाची सुरुवात आहे असे मानले जाते.

 

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीससाठी उपाययोजना

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस (सौम्य प्रमाणात मधुमेह) असेल तर आहार आणि व्यायाम यांच्या सहाय्याने मधुमेह बरीच वर्षे औषधाविना आटोक्यात ठेवता येऊ शकतो. या स्टेजमध्ये खाणेपिणे आणि व्यायाम याबाबत शिस्त पाळली नाही तर यापुढची अवस्था म्हणजेच मधुमेहाची अवस्था लवकर येऊ शकते. या अवस्थेत शिस्त आणखी कडक करावी लागते.

ग्लुकोमीटरने रक्तातील साखर तपासणी blood sugar check marathi
ग्लुकोमीटरने रक्तातील साखर तपासणी

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस असणाऱ्यांनी काय खावे? (जनरल गाईडलाईन्स)

  1. इडली, डोसा उत्तप्पा इत्यादी
  2. लापशी, खीर (साखर बेताची असावी),
  3. थालीपीठ, पराठा,
  4. भाजके चणे, शेंगदाणे (कच्चे असल्यास उत्तम, शेंगदाणे माफक प्रमाणात खावेत)
  5. ओल्या शेंगा (भुईमूग), हिरवा वाटाणा, मक्याचे कणीस
  6. काकडी, सफरचंद, केळी, कलिंगड इत्यादी
  7. नेहमीचे घरगुती जेवणाचे पदार्थ: चपाती, भाकरी, पिठले, डाळ, दही इत्यादी
  8. जास्त चोथायुक्त पदार्थ
  9. डाळी / कडधान्यं: छोले, वाटाणे, हरभरे, डाळ, उसळ इ.
  10. मोड आलेली कडधान्यं (मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.)
  11. हिरव्या पालेभाज्या, फळभाज्या, टोमॅटो, काकडी, कांदा, कोबी
  12. पपई, पेरू, बोरे, कलिंगड, नाशपाती, सफरचंद, डाळिंब यांसारखी फळे
  13. आख्खी कडधान्ये- उदा. मूग, मटकी, चवळी, उडीद, वाटाणा, चणे इ.
  14. कुरमुरे, भाजलेले चणे, मक्याचे कणीस, ओला हिरवा मटार इ.
  15. गहू, बाजरी, ज्वारी यांच्या पिठांच्या पोळ्या/भाकऱ्या
  16. पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या मिश्रपिठांच्या भाकऱ्या
  17. पाच-सहा आख्खी कडधान्ये + ज्वारी + गहू यांपासून बनविलेल्या रव्याची खीर किंवा उपमा
  18. व्होल व्हीट ब्रेड पासून बनवलेले व्हेज सॅंडविच

मधुमेही व्यक्तींनी काय खाऊ नये ? (जनरल गाईडलाईन्स)

  1. गूळ किंवा साखर (अगदी मध सुद्धा) घातलेले सर्व पदार्थ बंद
  2. कोकाकोला, पेप्सी, मिरिंडा, मॅंगोला, लिम्का यांसारखे सर्व कोल्ड्रिंक्स बंद करा.
  3. तळलेले सर्व पदार्थ, चकली, फरसाण वगैरे बंद करा.
  4. सर्व बेक केलेले पदार्थ, बिस्किटे, बंद करा.
  5. साबुदाणा, मैदा,रवा, खवा (मावा) यांपासून बनविलेले सर्व पदार्थ बंद
  6. पांढरा भात, बटाटा, रताळे कमी प्रमाणात कमी वेळा खा.
  7. पिकलेले आंबे, चिकू, पिकलेली केळी अतिशय कमी प्रमाणात खा.

प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन डायबिटीस असणाऱ्यांनी खालीलपैकी कोणताही व्यायाम करावा

  • जलद गतीने चालणे.
  • जॉगिंग
  • दोरीवरच्या उड्या
  • टेनिस, बॅडमिंटन यांसारखे खेळ.
  • पोहणे
  • सायकल चालवणे (घरी किंवा रस्त्यावर)
  • जॉगिंग मशीनवर जागच्या जागी पळणे
  • इलिप्टिकल ट्रेनरवर व्यायाम करणे
  • बागकाम करणे

1 thought on “प्रि-डायबिटीस किंवा बॉर्डरलाईन मधुमेह (Pre-Diabetes Information in Marathi)

  1. subhash says:

    सर,
    मी आपला आभारी आहे. आपण दिलेली माहिती खूपच उपयोगी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *