प्रकार 2 चा मधुमेह किंवा टाईप 2 डायबिटीस (Type 2 Diabetes Marathi Article)

प्रकार २ चा मधुमेह इन्सुलिनवर अवलंबून नसलेला मधुमेह म्हणजे काय: What is Type 2 Diabetes in Marathi?

साधारणपणे वयाच्या ४० वर्षांनंतर प्रकार २ चा मधुमेह आढळून येतो. अलीकडे ही वयोमर्यादा पास्तीशीपर्यंत येऊन ठेपली आहे. त्यामुळेच ३५-३६ वर्षांच्या तरुणांमध्ये,
विशेष करून IT क्षेत्रात नोकऱ्या करणाऱ्या तरुणांमध्ये, मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे असे अनेक पाहण्यांमध्ये आढळून आले आहे.
मात्र बरीच वर्षे त्याचे निदान होत नाही, कारण, लक्षणे सौम्य स्वरुपाची असतात.

टाईप-२ प्रकारच्या मधुमेहात स्वादुपिंडात इन्सुलिनचं उत्पादन सुरू असतं, पण ते पुरेसं नसतं. जेवढं इन्सुलिन तयार होतं तेही प्रभावी ठरत नाही, कारण शरीराची बोथट इन्सुलिन संवेदनशीलता (Reduced Insulin Sensitivity). संशोधकांचं असं म्हणणं आहे कि शरीराची इन्सुलिन संवेदनशीलता कमी होण्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांची बदललेली जीवनशैली! जंक फूड, वेळी-अवेळी घाईघाईने खाणं, एकसारखं एका जागी बसून काम करणं, घाईगर्दीच्या जीवनात व्यायाम करायला वेळ नसल्यामुळे तो न करणं वगैरे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *