कोलेस्टेरॉल म्हणजे काय? What is cholesterol In Marathi?

कोलेस्टेरॉल म्हणजे काय? कोलेस्टेरॉल कमी करण्याचे उपाय कोणते ?

आजकाल कोलेस्टेरॉल हा शब्द सतत कानावर पडतो. जो शब्द पूर्वी फक्त तज्ञांनाच माहित असायचा तो आता सर्वसामान्य माणसालाही माहित झाल्यामुळे हा फरक झाला आहे. आपल्या जीवनात आधीच एवढ्या चिंता, काळज्या असतात, जसे वजनवाढ, मधुमेह, ब्लड प्रेशर वगैरे! त्यात आता कोलेस्टेरॉलची भर पडली आहे! कोलेस्टेरॉलच्या नावाने मार्केटिंग खूप केलं जातं! साबणाच्या किंवा टूथपेस्टच्या जाहिरातीत जसे कीटाणू हे खलनायक ठरवले जातात तसेच गोडेतेलाच्या जाहिरातीत कोलेस्टेरॉलला खलनायक ठरवले जाते! कोलेस्टेरॉलविषयी जेवढी उत्सुकता, भीती व गैरसमज आहेत तेवढे इतर कशाबद्दलही नसतील. त्याचे कारण आहे कोलेस्टेरॉलचा हृदयविकाराशी जोडलेला संबंध. कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने खरोखरीच हृदयविकार जडतो का? कोलेस्टेरॉलयुक्त खाद्यपदार्थ खाल्ल्याने रक्तातले कोलेस्टेरॉल वाढते का? असे अनेक प्रश्न आणि शंका सर्वसामान्य लोकांच्या मनात येत असतात.
इ.स.१९६० च्या सुमारास “फ्रॅमिंगहॅम हार्ट स्टडी” या नावाने हृदयविकाराविषयी एक अभ्यास केला गेला. या अभ्यासात कोलेस्टेरॉलचे रक्तातील प्रमाण व हृदयविकाराचा धोका यांचा संबंध या विषयावर अभ्यास केला गेला. हा अभ्यास सतत दहा-बारा वर्षे चालू होता. त्यानंतर असा निष्कर्ष काढला गेला की ज्या लोकांच्या रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढलेले असते त्यांच्यात हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाणही वाढलेले आढळले. म्हणजेच रक्तातील कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे हृदयविकाराला आमंत्रण !
हा निष्कर्ष प्रसिद्ध झाला नी लोकांमध्ये आहारातून कोलेस्टेरॉलला कसे हद्दपार करावे याचा विचार सुरू झाला. खाद्यान्न आणि अन्नप्रक्रिया उद्योग चालवणाऱ्या धनदांडग्या देशी आणि मल्टीनॅशनल उद्योगपती वर्गाने याचा भरपूर गैरफायदा घेतला!
मग झाले कोलेस्टेरॉल-फ्री फूडचे फॅड सुरू!

आपल्या देशातील जनतेच्या सार्वत्रिक आहारविषयक अज्ञानामुळे अनेक धक्कादायक गोष्टी आपल्या लक्षात येतात. वानगीदाखल :

  • कोलेस्टेरॉल हा आपला शत्रू नसून मित्र आहे!
  • कोलेस्टेरॉल हा एक मेणासारखा चरबीयुक्त पदार्थ असून तो शरीरासाठी आवश्यक आहे.
  • कोलेस्टेरॉलशिवाय आपण एक मिनिटही जगू शकणार नाही कारण आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीचे आवरण कोलेस्टेरॉलपासून तयार केलेले असते.
  • ड जीवनसत्व (विटामिन D),  टेस्टोस्टेरॉन  (testosterone) व ईस्ट्रोजन (estrogen) सारखे हार्मोन्स, यांच्या निर्मितीत शरीराकडून  कोलेस्टेरॉल हा कच्चा माल म्हणून वापरला जातो.
  • कोलेस्टेरॉल हा शरीरात सतत निर्माण होणारा पदार्थ आहे, आपण आहारातून कोलेस्टेरॉल घेतले किंवा नाही घेतले तरी हा आपल्या यकृताद्वारे सतत शरीराची गरज भागविण्यासाठी पुरेशा प्रमाणात निर्माण केला जातो.
  • आहारातून सेवन केलेल्या कोलेस्टेरॉलचा रक्तातील कोलेस्टेरॉल वाढण्या किंवा कमी होण्यावर नाममात्र परिणाम होतो.
  • आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स कोलेस्टेरॉलपासून तयार होतात.
  • कोणत्याही वनस्पतीजन्य तेलात निसर्गतः कोलेस्टेरॉल मुळीच नसते.
  • कोलेस्टेरॉल फक्त काही प्राणीजन्य पदार्थांमध्ये असते. पण ते आरोग्याला घातक नसते, कारण ज्या लोकांना हृदयविकाराचा झटका येतो अशांपैकी ५०% लोकांचे रक्तातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण नॉर्मल असते.

आपण कोलेस्टेरॉल व्यायाम करून जाळून टाकू शकतो का?

कोलेस्टेरॉल हा जरी चरबीसारखा पदार्थ असला तरी आपण जशी व्यायाम करून चरबी जाळू शकतो तसे कोलेस्टेरॉल मात्र जाळू शकत नाही.

कोलेस्टेरॉल हे चांगले की वाईट?

जर आपण तूप गरम दुधात किंवा पाण्यात टाकले की ते मिसळले न जाता त्यावर तरंगते. त्याचप्रमाणे कोलेस्टेरॉल हे जर थेट रक्तात सोडले तर ते मिसळले जाणार नाही. यावर उपाय म्हणून आपल्या शरीराने एक युक्ती केली आहे. चरबी किंवा कोलेस्टेरॉल रक्तातून वाहून नेण्यासाठी ते एका बुडबुड्यासारख्या वेष्टनात लपेटले जाते हे वेष्टन प्रथिनांचे असल्याने ते रक्तात विद्राव्य असते. या बुडबुड्यालाच लायपोप्रोटीन (lipoprotein) म्हणतात. कमी-अधिक घनतेप्रमाणे लायपोप्रोटीनचे 2 ते 3 प्रकार आहेत.

  1. Low-density lipoproteins (LDLs) लो डेन्सिटी लायपोप्रोटीन हे वाईट समजले जाते, कारण, ते यकृताकडून  शरीरातल्या विविध पेशींकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते.
  2. High-density lipoproteins (HDLs) हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन हे चांगले समजले जाते, कारण, ते शरीरातल्या विविध पेशींकडून  यकृताकडे कोलेस्टेरॉल वाहून नेते. जितके जास्त रक्तातील HDL तितकी तुमची हृदयविकाराची जोखीम किंवा रिस्क कमी असते!

रक्तातल्या कोलेस्टेरॉलचा आणखीही एक प्रकार असतो
Very Low-density lipoproteins (VLDLs) व्हेरी लो डेन्सिटी लायपोप्रोटीन.
VLDL, HDL आणि LDL हे फक्त रक्तातच असतात, अन्नामध्ये नाही!

कोलेस्टेरॉलबद्दल काळजी करण्यासारखे काय?

रक्तात कोलेस्टेरॉल जर ठराविक पातळीपेक्षा जास्त झाले तर हृदयविकार, पक्षाघात यांसारख्या विकारांची शक्यता वाढते असे तज्ञांचे मत आहे. रक्तातल्या जास्त कोलेस्टेरॉलमुळे हृदयासकट सर्व धमन्यांच्या भिंती कठीण होतात, त्यांची लवचिकता कमी होते आणि त्या हळूहळू अरुंद होऊ लागतात. अश अरुंद झालेल्या धमन्यांमधून संबंधित अवयवाला ऑक्सीजन आणि ग्लुकोज यांचा अपुरा पुरवठा होतो. हृदयाच्या बाबतीत हे घडले तर हृदयविकार आणि मेंदूच्या बाबतीत घडले तर पक्षाघात हे विकार होऊ शकतात.

रक्तात किती कोलेस्टेरॉल हे जास्त समजले जाते?

लिपिड प्रोफाइल नावाची एक रक्ताची चाचणी असते जी आजकाल सर्व पॅथॉलॉजी  लॅब्जमध्ये केली जाते. यात रक्तातील एलडीएल, एचडीएल आणि ट्राइग्लिसराइड यांचे प्रमाण मोजले जाते.  टोटल कोलेस्टेरॉल एका प्रौढ व्यक्तीमध्ये 200 मिलीग्राम/डीएल (डेसीलिटर) पेक्षा कमी असेल तर योग्य मानले जाते.  200 ते 239 मिलीग्राम/डीएल असेल तर बोर्डरलाईन जास्त समजले जाते आणि आहार, व्यायाम आणि योग, प्राणायाम इत्यादी उपायांनी त्यावर नियंत्रण आणण्याचा सल्ला दिला जातो. 240 मिलीग्राम/डीएल पेक्षा अधिक असेल तर ते धोकादायकरित्या उच्च पातळीला गेल्याचे मानले जाते आणि औषध योजना केली जाते.

टोटल कोलेस्टेरॉल (total Cholesterol)
200 पेक्षा कमी उत्तम नियंत्रण (Good Control)
200 ते 239 बॉर्डरलाईन जास्त (Borderline High)
240 पेक्षा जास्तखूप जास्त (Very High)
एल.डी.एल. कोलेस्टेरॉल (LDL Cholesterol) किंवा लो डेन्सिटी लायपोप्रोटीन
100 पेक्षा कमी उत्तम नियंत्रण (Good Control)
100 ते 150 बॉर्डरलाईन जास्त (Borderline High)
200 पेक्षा जास्तखूप जास्त (Very High)
एच.डी.एल. कोलेस्टेरॉल (HDL Cholesterol) किंवा हाय डेन्सिटी लायपोप्रोटीन
50 ते 60 किंवा त्यापेक्षा जास्त उत्तम नियंत्रण (Good Control)
45 ते 50 बॉर्डरलाईन कमी (Borderline Low)
40 पेक्षा कमीखूप कमी (Very Low)
ट्रायग्लीसराईडस (Triglycerides)
150 पेक्षा कमी उत्तम नियंत्रण (Good Control)
150 ते 200 बॉर्डरलाईन जास्त (Borderline High)
200 ते 500 जास्त (High)
500 पेक्षा जास्तखूप जास्त (Very High)
स्रोत: सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिवेन्शन (Center for Disease Control and Prevention)

तुमचे कोलेस्टेरॉलचे आकडे महत्त्वाचे आहेतच, पण हे आकडे म्हणजे तुमच्या एकंदर आरोग्याचा अगदी छोटासा भाग असतात. तुमची फॅमिली हिस्ट्री, वय, लिंग (स्त्री/पुरुष), तुमचा आहार, तुम्ही किती व्यायाम करता, तुमची एकंदर जीवनशैली, धूम्रपान वगैरे बाबींची तुमच्या आरोग्यावर बरावाईट परिणाम करण्याची भूमिका असते तुमचे फॅमिली डॉक्टर किंवा स्पेशालिस्ट तुमचे कोलेस्टेरॉलचा रिपोर्ट पहातील, आणि त्यासोबतच तुमची फॅमिली हिस्ट्री आणि वर सांगितलेल्या इतर बाबी तपासून तुम्हाला हृदयविकार (heart disease) किंवा पक्षाघात (stroke) यासारख्या व्याधींचा किती धोका असू शकतो याचे मूल्यमापन करतील. आणि त्यानुसार औषध योजना, आहार, व्यायाम इत्यादींची शिफारस करतील.

फक्त कमी किंवा जास्त कोलेस्टेरॉलचे आकडे हे तुमच्या आरोग्याचे निदर्शक नाहीत

वरील विवेचनावरून तुमच्या हे लक्षात आले असेल की कोलेस्टेरॉलचा रिपोर्ट वाईट आला म्हणून जिवाला फारसा घोर लावून घेण्याची गरज नाही. तथापि स्पेशालिस्ट डॉक्टर कडे जाऊन त्यांच्या सल्ल्याने पुढे जाऊन उपाययोजना करणे मात्र आवश्यक आहे.

12 thoughts on “कोलेस्टेरॉल म्हणजे काय? What is cholesterol In Marathi?

  1. DEEPAK says:

    २२४ कोलेस्टेरॉल

    1. Deepali Kalhapure says:

      कोलेस्टेरॉल सिरम १९५.४ इस नॉर्मल

  2. Arun musale says:

    Lipid प्रोफिले
    Serum Trglyoeride_348.7
    Serum cholesteol_212.7

  3. Nitin Gaikwad says:

    Hdl ४५.0
    ldl 124.२
    vldl 58.८

    please
    tell me about report

  4. Indrajeet Jaysing salunkhe says:

    My total cholesterol is 242. Then what should I do for control it.

  5. Sanjay Laxman Pednekar says:

    My total cholesterol is 242
    HDL 50,. LDL 170 and VLDL 22 and triglycerides is 112

    My hmocystine. 11.40

    Vitamin B12. 300

    Is it very big trouble? Suggest me…

  6. cholestoral leval on 220.
    pls give me guidance

  7. Diabetes says:

    धन्यवाद ह्या माहिती दिल्या बदल.

  8. Nilesh nimbalkar says:

    Total cholesterol:292.६
    Hdl cholesterol:52.४
    Lol cholesterol:46.५४
    Vldl cholesterol:193.६६
    Triglycerides::968.३
    Total hdlc ratio:05.५८
    Ldl::Hdl=00.89

  9. Maya kasbe says:

    My mother
    Age 51
    Total cholesterol 257.25
    HDL 43.9
    Triglycerides 196.2
    LDL 174.1
    Vldl 39.2
    TC/hdlc ratio 5.9
    Ldlc /hdlc ratio 4.0

  10. Anil P.Latne says:

    Age – 45
    Cholesterol – 144
    HDL – 35
    LDL – 96 .8
    VLDL – 12 .2
    total Lipids – 549
    please
    tell me about रिपोर्ट & suggestion

  11. Kuldeep mane says:

    Total cholesterol : 232. S.triglycerides : 212. Hdl : 43. Vldl : 42.40. Ldl : 146.60. Tc/Hdlc : 5.40. Ldlc/Hdlc : 3.41

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *